संत तुकाराम महाराज यांचा अर्थविवेक
( 'संत तुकाराम बीज ' निमित्त ) महाराष्ट्र भूमीतील संतांनी आध्यात्माचा मळा फुलविता फुलविता समाजरुपी बागेत वाढलेलं विकृतीचे तण उपटून टाकून ही बाग सुंदर व आकर्षक करण्याचा प्रयत्न केला किंबहुना त्यांनी केलेल्या नीतिसंस्कारामुळे समाजमन निकोप आणि निरोगी राहण्यास मदत झालेली आहे.वास्तविक संतांनी आपले उभे आयुष्य 'स्व' विकासापेक्षा समाजाच्या विकासासाठी वाहिले आणि अवनत होत चाललेल्या समाजाला उन्नतीकडे जाण्याचा मार्ग दाखविला.परिणामस्वरूप अंधश्रद्धेपेक्षा विज्ञाननिष्ठा, अविवेकापेक्षा विवेकनिष्ठा , व्यभिचारापेक्षा अव्यभिचारीपणा अशा मूल्यनिष्ठतेची पूजा समाजमनात मोठ्या प्रमाणात वाढीस लागली. २१व्या शतकात विज्ञान युगातील मानव मात्र यशाची उत्तुंग शिखरे गाठतो आहे ;परंतु देशात बऱ्याचदा नीतिमत्तेच्या सुगंधापेक्षा अनीतिमत्तेची दुर्गंधी दिसते आणि मन खिन्न व्हायला लागतं. पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची माणसाची प्रवृत्ती पाहून सर्व बाजूंनी अंधारल्यासारखं वाटायला लागतं.इथे युरिया घोटाळा,तेलगी प्रकरण,टु-जी स्पेक्ट्रम,राष्ट्रकुल, आदर्श घोटाळा,चारा घोटाळा, आरोग्य घोटा...