Posts

Showing posts from March, 2025

संत तुकाराम महाराज यांचा अर्थविवेक

Image
 ( 'संत तुकाराम बीज ' निमित्त )      महाराष्ट्र भूमीतील संतांनी आध्यात्माचा मळा फुलविता फुलविता समाजरुपी बागेत वाढलेलं विकृतीचे तण उपटून टाकून ही बाग सुंदर व आकर्षक करण्याचा प्रयत्न केला किंबहुना त्यांनी केलेल्या नीतिसंस्कारामुळे समाजमन निकोप आणि निरोगी राहण्यास मदत झालेली आहे.वास्तविक संतांनी आपले उभे आयुष्य 'स्व' विकासापेक्षा समाजाच्या विकासासाठी वाहिले आणि अवनत होत चाललेल्या समाजाला उन्नतीकडे जाण्याचा मार्ग दाखविला.परिणामस्वरूप अंधश्रद्धेपेक्षा विज्ञाननिष्ठा, अविवेकापेक्षा विवेकनिष्ठा , व्यभिचारापेक्षा अव्यभिचारीपणा अशा मूल्यनिष्ठतेची पूजा समाजमनात मोठ्या प्रमाणात वाढीस लागली.     २१व्या शतकात विज्ञान युगातील मानव मात्र यशाची उत्तुंग शिखरे गाठतो आहे ;परंतु  देशात बऱ्याचदा नीतिमत्तेच्या सुगंधापेक्षा अनीतिमत्तेची दुर्गंधी दिसते आणि मन खिन्न व्हायला लागतं. पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची माणसाची प्रवृत्ती पाहून सर्व बाजूंनी अंधारल्यासारखं वाटायला लागतं.इथे युरिया घोटाळा,तेलगी प्रकरण,टु-जी स्पेक्ट्रम,राष्ट्रकुल, आदर्श घोटाळा,चारा घोटाळा, आरोग्य घोटा...

पर्यावरण व संत श्री तुकाराम महाराज

Image
      संत तुकारामा महाराजांची अभंग गाथा ही एक जीवनाची पथदर्शी गाथा . . .जगण्यासाठीचा एक आश्वासक सूर . . .आमच्या दैनंदिन जीवन व्यवहारातील  . समस्या आणि त्यावरील उत्तर संत साहित्यात सापडतं आणि सापडतंच . . .संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ,संत एकनाथ , संत गोरा कुंभार, संत सावता माळी , संत नरहरी सोनार ,संत चोखामेळा ,संत सेना न्हावी आदीसारख्या संतांच्या रचना मानवी जीवनातील विविध समस्यांचे निरसन करण्यास  उपयुक्त ठरतात. संत तुकारामांचे अभंग हे तर विविध अंगाने सजलेले ,नटलेले व मानवी जीवनातील विविध जाणिवांचा आविष्कार करणारे आहेत.सामाजिक समता,अंधश्रद्धा निर्मूलन ,अर्थविचार ,कृषिविचार अशा विविध अंगाचा विचार त्यातून आपल्याला घेता येतो.पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीनेही संत तुकारामांचे अभंग  महत्त्वपूर्ण ठरतात.वास्तविक जीवन जगत असताना आम्ही आमच्या सुखासाठी निसर्गाचं नैसर्गिक निसर्गत्व  हिरावून घेतो आहोत किंबहुना निसर्गावर घाला घालून अप्रत्यक्ष आमच्यावरच तो घाला घालतो आहोत.प्राणिमात्राकडून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड हे वृक्ष शोषून घेतात आणि आम्हाला आवश्यक असलेला ऑक...